जळगाव ;- शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज शुक्रवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
अतुल रमेश पाटील (वय-२६) रा. चिनावल ता. रावेर. ह.मु. जय भवानी कॉलनी मेहरूण असे मयताचे नाव आहे . अतुल हा गेल्या काही दिवसांपासून घरी एकटाच राहत होता. दरम्यान पत्नी ह्या दोन वर्षाच्या मुलासह माहेरी गेल्या आहे. सिंधी कॉलनीतील संतचोखामेळा वसतीगृहासमोरी भक्ती मेडीकल चालवितो. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारा अतुल पाटील याने राहत्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले आहे. शेजारी राहणारा मित्र नयन पारधे याने तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.