चाळीसगाव — एकामागे एक चार मेडिकलवर चोरीच्या घटनेने मेडिकल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या कोरोना महामारीत रांत्रदिवस काम करणारे मेडीकल व्यावसायिक कोरोनायोद्धा आहेत. चोरीच्या घटनेने त्यांचे मनोबल खच्चीकरण झाले असून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त तपास अधिकारी नेमावा. येत्या तीन दिवसांत मुद्देमालासह आरोपींना अटक करण्याचे निर्देश खा. उन्मेश पाटील यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहे.
याप्रसंगी चाळीसगाव मेडिकल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव प्रेमसिंग पवार , उपाध्यक्ष विनोद जैन, सहसचिव एकनाथ पाटील, कार्यकारी सदस्य मंगेश महाजन, योगेश येवले, प्रशांत मालू, पुष्पाताई चौधरी, संजय ब्राह्मण कार,संजय वाघ, संदीपभाऊ बेदमुथा, वसंतराव चव्हाण, योगेश येवले यांच्यासह अनेक मेडिकल व्यवसायिक बांधव उपस्थित होते.