जळगाव (प्रतिनिधी ) ;- ॲथलेटिक्समधील इतिहास शनिवारी नीरज चोप्राने बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करत ॲथलेटिक्समधील 125 वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. याप्रसंगी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल एकलव्य क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंनी जल्लोष केला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला आणि नीरज चोपडा २००८नंतर ( अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला. भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.