• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माझी बेकायदा मालमत्ता सिद्ध करा , तुम्हाला दान देऊन टाकीन

एकनाथराव खडसे यांचं राजकीय विरोधकांना आव्हान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिंधी ) – एकनाथराव खडसे आणि भाजप यांच्यातील सापा – मुंगसाचे राजकीय वैर दिवसेंदिवस गडद होत असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे माझी बेकायदा मालमत्ता सिद्ध करा , तुम्हाला दान देऊन टाकीन असे आव्हान एकनाथराव खडसे यांनी राजकीय विरोधकांना दिले.

कुऱ्हा काकोड येथे एका कार्यक्रमात बोलताना एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की , मी भाजप सोडला तंव्हा मला का दुसऱ्या पक्षांचे पर्याय नव्हते का ? मी मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो आणि आता हा पक्ष माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे सीडी थोडक्यात अडकली आहे सध्या सीडीचा विषय पोलिसांकडे आहे.समाज सीडी मी नाही दिली तरी कुणाची असेल हे सगळ्यांना माहिती आहेच की ….. माझ्या सगळ्या प्रकारच्या चौकशा त्यांनी केल्या आय कर खात्याने २ वेळा चौकशी केली आणि बेकायदा काहीच नसल्याचे सांगितले लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला मग आता ईडी कशासाठी ? माझ्यावर दाखल केलेल्या आरोप पत्रात ईडीने खूप खोटेनाटे आरोप लावले आहेत मला घोटाळ्याचा मास्टरमाईंड म्हटलेले आहे २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या चौकशीसाठी ईडी असते का ? रोख व्यवहार केला तिथे मनी लॉन्डरिंग होते आम्ही असे व्यवहार केले नाहीत. आम्ही कर्ज घेतले आणि व्याजासह ४ वर्षात फेडले आहे आता त्यासाठी ईडी चौकशी करते आहे १ रुपयाचाही गैरव्यवहार नाहीय मला जे वेतन भत्ते मिळतात त्या खात्यावरून व्यवहार झाला आहे मग तो काळा पैसे कसा ? त्या व्यवहाराशी माझ्या जावयाचा काय संबंध ? जावयालाही अटक केली ती फक्त त्रास देण्याच्याच हेतूने केली कुछ भी करो लेकिन नाथाभाऊ को अंदर डालो असे हे सगळे सुरु आहे गेल्या ४० वर्षात एकाने तरी सांगावे की नाथाभाऊने विनाकारण पैसा घेऊन लुबाडले , अडवणूक केली . एकाएकी बिघडायला मी काय विश्वामित्र आहे का ? मी सामान्य माणूस आहे मी ४० वर्षात चारित्र्य जपले याचा अर्थ मात्र असा होतोय की नाथाभाऊ त्यांना भारी आहे . आता घरी गेल्यावर एक काम करा , गुगल वर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र सर्च करा …. एवढे माझे विरोधक जगात प्रसिध्द्ध आहेत . माझे विरोधक म्हणतात की माझ्या मालमत्तांचे १०० उतारे त्यांच्याकडे आहेत त्यांनी माझी बेकायदा मालमत्ता सिद्ध करावी ती बेकायदा मालमत्ता मी त्यांना दान देऊन टाकीन असा सगळं खटाटोप सुरु असल्याने काहीही करून उद्या मला तुरुंगात टाकले गेले तरी तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका ईडीची नोटीस आली तेंव्हा मी २ दिवस गायब होतो असे काही जण म्हणाले मी गायब का होऊ ? मी २ दिवस फर्दापूरच्या विश्रामगृहात होतो ते विश्रामगृह कशासाठी प्रसिद्ध आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मी प्रसंगी उच्चं आणि सर्वोच्च न्यायालयात जाईन माझ्यापुढे ते पर्याय आहेत न . ज्या नाथाभाऊने मेहनत केली त्याला हे झाले नाहीत , तर तुम्ही काय रे ?, असा प्रश्न विचारणारा सल्ला माझा सध्या भाजपमध्ये असलेल्यांना आहे . फक्त एका माणसाच्या नादाला लागून तुम्ही हे करीत आहेत खोट्या आरोपांच्या आधारावरच मला मंत्रिपद सोडायला भाग पाडलं गेलं दाऊदच्या बायकोसोबत संबंध असे सांगितले गेले , मी तिला ओळखतही नाही . मला तिचे वयही माहिती नाही आता बीएचआरशी संबंध नाही असे ते म्हणाले न …. कारण मी हा घोटाळा बाहेर काढल्यापासून ३ वर्षात त्यांचा जीव खाली वर होतोय जामनेरला भन्साळी नावाच्या माणसाच्या नावावर बी एच आरकडून जमीन खरेदी केली गेली आहे बी एच आरकडून जमीन खरेदी केली असा उल्लेख उताऱ्यावर आहे १० कोटीची ही जमीन १ कोटीत घेतली गेली आहे हजार कोटींची त्यांची बेनामी मालमत्ता मी सिद्ध करून देतो नाशिकची ४३ एकर जमीन त्यांनी दुसऱ्याच्या नावावर घेतली आहे ती फक्त ७ ते ८ कोटीत घेतली पुण्यात ५० वर्षांपूर्वी जमीन मालकाला एमआयडीसीने ही जमीन आम्हाला लागणार आहे अशी नोटीस दिली होती नंतर ती जमीन घेतलीही नाही आणि मालकाला काही मोबदला दिलाही नाही मग ही जमीन एमआयडीसीची कशी ? नाथाभाऊंचे असे अपमान वारंवार झाले रोहिणीताईला ठरवून उमेदवारी देऊन ठरवून पाडले गेले आता राष्ट्रवादीमध्ये आल्यावर मला समजू लागले की भाजपमध्ये गद्दार कोण आहेत ते . माझा आमदार साहेबांनाही प्रश्न आहे की ते कुणाच्या बळावर निवडून आले , असेही एकनाथराव खडसे म्हणाले.


 

 

Previous Post

जामनेरात महावितरणचा भोंगळ कारभार

Next Post

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्या ; शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्या ; शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon