महिला बालकल्याणच्या राजपत्रित अधिकारी संघटनेचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : जि.प महिला बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राउत यांच्या पत्नी अधिक्षीका मयुरी राऊत करपे यांच्या मृत्यूची विशेष चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषीवर कारवाई करा या मागणीसाठी दि.१९ रोजी महिला बालकल्याणच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
देवेंद्र राऊत यांच्या अधिनिस्त कार्यालयात १९ पैकी १८ बालविकास प्रकल्प अधिकारींची पदे रिक्त असुन प्रकल्प स्तरावर १९ पैकी १७ पदे रिक्त आहे. उपरोक्त बाबी विचारात घेता क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक मिळावी, कामकाजाच्या वेळा शासकीय धोरणाशी सुसंगत असाव्यात अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी रफीक तडवी, सचिन जाधव, विजयसिंग परदेशी, महिला व बालविकास अधिकारी सोनवत यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.