पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीसोबत घडला गैरप्रकार
जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत ती अल्पवयीन असताना तिच्या मावस काकाने वेळोवेळी कल्याण व पाचोरा तालुक्यातील एका गावात वेळोवेळी शारीरिक अत्याचार करून तिला गरोदर केले. नंतर आई, काका व कुटुंबियांनी तिचा गर्भपात केला, या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात हे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २०१९ साली कोणगाव, कल्याण येथे आणि २०२५ च्या मे-जून महिन्यात तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. ती सातवीत असतानाही तिचा मावस काका प्रवीण इंगळे (रा. कोंडगाव, कल्याण जि. ठाणे) याने विनयभंग केला होता. दरम्यान त्याच्यामुळे वारंवार शारीरिक अत्याचारातून सदर तरुणी ही गर्भवती राहिली.
तिच्या कुटुंबीयांना ही माहिती समजताच तिचे आई, काका व आजी, बाबा यांनी पाचोर्यातील एका डॉक्टरांकडे जाऊन तिचा गर्भपात करून घेतला. याबाबत सदर तरुणीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा मावस काका, आई, काका, आजी, बाबा यांच्याविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.









