जळगाव तालुक्यात चिंचोली, धानवड,उमाळासह विविध गावात प्रचार
जळगाव (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे नेते, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असून त्यांच्या कार्यात लोकांच्या कल्याणाची भावना असल्याची प्रतिक्रिया दररोजच्या रॅल्यांमध्ये ऐकू येत आहे. चिंचोली – धानवड – उमाळा – कंडारी , देव्हारी – कुसुंबा भागात त्यांनी शनिवारी प्रचार केला. मला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधतांना केले.
यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सरिताताई कोल्हे माळी, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील होते. कुसुंबा व परिसरात भव्य रॅलीनंतर चौकाचौकांमध्ये मध्ये ग्रामस्थांशी गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला. चिंचोली, धानवड, आणि कुसुंबा परिसरात गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. रस्ते सुधारणा, पुलांचे काम, पाणी पुरवठा योजना, बेघरांना कायमस्वरूपी जागा देवून शेकडोंचा घरकुल प्रश्न मार्गी लावला आणि शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर, विविध सोयी-सुविधा यांमध्ये झालेला बदल हा त्या विकासाचा जिवंत पुरावा आहे. असे कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी सांगितले.
रॅल्यांमध्ये स्थानिक सेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, देविदास कोळी, विजय लाड, भाजपाचे हर्षल चौधरी, मनोहर पाटील, रघुनाथ चव्हाण, नाना वाघ, गोकुळ महाजन, मयूर महाजन, संजय घुगे, जितु घुगे, अतुल घुगे,मनोज घुगे, मिलिंद लाड , जितु पोळ, ब्रिजलाल पाटील, संभाजी पवार, राजू पाटील, शिवा मांडे, विलास घुगे, शिवाजी मांडे, संदीप बिर्हाडे, योगेश सोनावणे, सुनील लाड, संदीप लाड, नंदूआबा पाटील, बबलू पाटील, कैलास बिर्हाडे , प्रवीण पाटील, सरपंच यमुनाबाई ठाकरे, भारतीताई पाटील, निलेश ठाकरे, आकाश पाटील, भूषण पाटील, ज्योतीताई पोळ, ज्योतीताई शिवदे, अंकुश मोरे , कैलास कोळी, चंद्रकांत पाटील, फिरोज तडवी, विजय पाटील, मगन पाटील, रायपूर येथील सरपंच रजनीताई सपकाळे, प्रवीण परदेशी, सिताराम परदेशी, राजेंद्र परदेशी पुष्पाबाई परदेशी, चेतन परदेशी यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.