एरंडोल (प्रतिनिधी) – मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण नियोजनासाठी एरंडोल तहसीलदार कार्यालयात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
तहसिलदार यांचे दालनात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात मतदारांमध्ये जागृती नवीन मतदार नोंदणी , दुबार मतदारांचे नाव वगळणे , गरुडा ऍप्लीकेश व मतदार हेल्प ऍप्लीकेशनच्या माहितीसंदर्भात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख , डीडीएसपी कॉलेज यांचे निवडणुक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष , एरंडोल तालुक्याचे सर्व 137 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) उपस्थित होते.
पत्रकारांच्या सहभागासह 23 सप्टेंबररोजी झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी भुषविले . एका मतदाराचं नांव एकाच विधानसभा मतदारसंघातील एकाच मतदार यादीमध्ये समाविष्ट असावे . अन्य विधानसभा मतदार संघात नांव नोंदविलेल्या मतदारांनी इतर मतदारसंघात असलेले त्यांचे नांव तात्काळ कमी करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे 30 सप्टेंबरपावेतो ज्यानी वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनी तात्काळ नांव नोंदणी करावी . यासाठी शासनाच्या https://www.nvsp.in/ या वेबसाईट वर online मतदार नोंदणी तसेच दुरुस्त्या देखील करता येणार आहेत . या बैठकीसाठी मनोहर राजेन्द्रे यांनी परिश्रम घेतले.







