अपक्ष भगवान महाजन १६ हजार मतांनी पिछाडीवर
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरीअखेर अमोल पाटील यांनी सुमारे १६ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार भगवान महाजन हे १६ हजार मतांनी पिछाडीवर आहे.

अमोल पाटील यांना ३७ हजार १८३ आणि अपक्ष भगवान महाजन यांना २० हजार ७९७ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे सतीश अण्णा पाटील यांना १४ हजार ८३९ तर अपक्ष हर्षल माने यांना १५९८ मते मिळाली आहे. आतापर्यंत ८ फेऱ्या संपल्या असून अजून १४ फेरी बाकी आहे.