चोपडा (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरीअखेर प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सुमारे ८ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे प्रभाकर सोनवणे हे चांगली लढत देताना दिसून येत आहे.
प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना ३५ हजार ९३७ आणि प्रभाकर सोनवणे यांना २७ हजार ३५७ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष हिरालाल कोळी यांना ८२५ तर भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भिल यांना ६२६ मते मिळाली आहे. आतापर्यंत ७ फेऱ्या संपल्या असून अजून १८ फेरी बाकी आहे.