जळगाव ;- शहरातील संचारबंदी लागू असतांना ईच्छादेवी चौकात नियमांचे उल्लंघन २२ वर्षीय तरूणीवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी संचारबंदीचे आदेश काढण्यात आल्यानंतरही शहरात विनाकारण दुचाकीने फिरून नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील इच्छादेवी चौकात आज सकाळी ११.३० वाजता २२ वर्षीय तरूणीने तोंडावर मास्क न घालता दुचाकीने क्रमांक (एमपी ०९ एसजे ६०३७) वरून जात असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी यांनी चौकशीसाठी थांबविले असतांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. रामकृष्ण पाटील, मपोहेकॉ मालती वाडीले, मपोका आशा सोनवणे यांनी कारवाई केली