अमळनेर तालुक्यात लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी
त्यांचे कळमसरे शिवारात पाच बिघे शेत असून त्यात ज्वारीचे पीक लावले होते. ते काढणीसाठी कापून शेतात ढीग करून ठेवले होते. त्यातून शंभर क्विंटल ज्वारी येणे अपेक्षित होते. मात्र ११ एप्रिल रोजी बाजूच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लावलेली आग ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या शेतात पोहचल्याने ज्वारीची गंजी खाक झाली आहे. दरम्यान, मारवड येथील आगीचा पंचनामा करण्यात आला असून पुंजू शिवलाल चौधरी यांचे ७ लाख ९१ हजार, प्रवीण आधार पाटील यांचे ३ लाख ७७ हजार, किरण वसंतराव साळुंखे २ लाख २५ हजार, कैलास रामचंद्र पाटील २ लाख ७६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
विलास प्रकाश पाटील २ लाख ५० हजार, महेश हेमकांत पाटील १ लाख ५० हजार रुपये, सचिन गुलाबराव पाटील १ लाख ३१ हजार, अशोक अमृत पाटील १ लाख ३५ हजार, दिलीप नीलकंठ पाटील १ लाख ३५ हजार, रवींद्र अमृत पाटील ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. मांगो पीतांबर पाटील २ लाख ३१ हजार ८७६ रुपये, गजानन मन्साराम चौधरी १ लाख ७० हजार रुपये असे एकूण २९ लाख ५६ हजार ८७६ रुपयांचे नुकसान झाले. ग्राम महसूल अधिकारी महेंद्र भावसार यांनी पंचनामा केला.
या आगीत १२ शेतकऱ्यांची जवळपास शंभर क्विंटल ज्वारी, चारा व शेती साहित्य जळून खाक झाली आहे. याबाबत चौकशी करण्यात येऊन या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ शेतकऱ्यांचे पीकांचे संपूर्ण उत्पन्न आगीत जळून खाक झाले आहे. या आगीचा तपास पोहेकॉ. संजय पाटील हे करीत आहेत.