अमळनेर शहरातील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाला एकाने मारहाण केल्याने त्याचा जबडा फॅक्चर झाल्याची घटना दिनांक १० रोजी दुपारी ३ वाजता घडली.
जतीन भटू पाटील रा. त्रिमूर्तीनगर, साई पुष्पा रेसिडन्सी याला १० रोजी त्याचा मित्र कल्पेश विजय खैरनार याने फोन करून मला घ्यायला ये असे सांगितले. जतीन त्याला मोटरसायकलवर घ्यायला गेला असता राधे लखन जाधव रा. झामी चौक हा त्याठिकाणी आला व कल्पेश खैरनार याच्याशी भांडू लागला. जतीन त्याच्याजवळ गेला असता राधे याने तोंडावर जोरात बुक्का मारला. त्याचा जबडा फॅक्चर होऊन तोंडातून रक्त येऊ लागले. मित्रांनी त्याला खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. जतीन याची आई भाविता भटू पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून राधे जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंके करीत आहेत.