जळगाव ( प्रतिनिधी ) – आमच्या सोबत का राहत नाही असे म्हणत एका मित्राला चौघांनी लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना काल रात्री शहरात घडली

शहरात पिंप्राळा हुडको भागात राहणारा मनीष सोनावणे मजुरी करतो . त्याला रविवारी सायंकाळी सम्राट कॉलनी भागात ललित दीक्षित , गणेश सोनार , अविनाश राठोड , कृष्णा चव्हाण या चार जणांनी आमच्या सोबत का राहत नाही असे म्हणत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली काल रात्री या चार आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ सुनील सोनार करीत आहेत







