जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील सिंधी कॉलनी भागातील बाबा नगर येथे माझ्या मामीला घेऊन का फिरत आहे या कारणावरून एकाने अरविंद मुकेश कुकरेजा वय २९ याला लोखंडी पट्टीने मारून हाताला दुखापत केली . तसेच इतर दोन जणांना चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुकेश कुकरेजा हे घराकडे जात असताना त्यांना त्यांची मामी जया प्रेम कटारिया ह्या कमलेश चिमराणी सोबत दिसल्याने माझया मामीला का घेऊन फिरत आहे असे विचारल्यावरून कमलेश चिमराणी याने अरविंद मुकेश कुकरेजा याला चापट बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी पट्टीने हातावर दुखापत केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मामा प्रेम कटारिया, वडील मुकेशकुमार कुकरेजा बहीण दिव्या कुकरेजा यांना शिवीगाळ करून मारहाण केली . अशी फिर्याद अरविंद कुकरेजा यांनी दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुनील सोनार करीत आहे.