चाळीसगाव ;- तालुक्यातील गोरखपूर तांडा येथे किरकोळ कारणावरून एकास झोडपल्याची घटना घडली असून याबाबत ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन राजेंद्र राठोड (वय-२८ रा. गोरखपूर तांडा ता. चाळीसगाव) त्याच्या घरासमोरील रोडावर रेती व लाकडे हे पडलेले असल्याने ते उचलून घे असे म्हणत त्यांना बाबुलाल पान्हा राठोड, संजय पान्हा राठोड, मानसिंग पान्हा राठोड, सुरेश प्रकाश चव्हाण आदींकडून त्रास दिला जात होता.
शुक्रवार, ७ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रेती व लाकडे उचलून घे म्हणत नितीन राजेंद्र राठोड याला वरील जणांकडून जबर मारहाण करण्यात आली. यातील बाबूलाल राठोड यांनी लाकडी दांडक्याने नितीन राठोड याच्या उजव्या हाताच्या कामेवर मारून गंभीर दुखापत पोहोचवली. तर संजय पान्हा राठोड याने हातातील लाकडी दांडक्याने उजव्या पायाच्या पोटरीवर मारले. मानसिंग पान्हा राठोड याने हातातील काठीने पोटावर व पाठीवर मारहाण केली. तर, सुरेश प्रकाश चव्हाण याने चापट व बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
नितीन राजेंद्र राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केले आहेत.पुढील तपास दिपक ठाकूर हे करीत आहेत.