जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गिरणा पाण्याची टाकीजवळ पैशांचे देवाण घेण्यावरून एकाला दोन जणांकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत करण्यात आली आहे. जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी १४ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजित पुरुषोत्तम चौधरी (वय-४४, रा. नंदनवन नगर जळगाव) हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील गिरणा पाण्याची टाकी जवळ ते उभे होते. त्यावेळी त्यांच्यात आणि सचिन अशोक येवले रा. पाचोरा तसेच राधेश्याम वसंत भामरे रा. रायसोनी नगर, जळगाव या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर सचिन येवले आणि राधेश्याम भामरे या दोघांनी सुजित चौधरी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.
त्यानंतर दोघांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी अवस्थेत सुजीत चौधरी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सुजित चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन अशोक येवले आणि राधेश्याम वसंत भामरे या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.