जळगाव;– गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या चौघांनी दोन जणांना पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि शहरातील गेंदालाल मिल मध्ये राहणारे नाजीमखॉ कादिरखॉ पटवे, रिजवाना बी शेख आमीर, आबेदाबी, फरिनबी जुबेर खान यांनी मागील भांडणाच्या कारणावरून एक महिला आणि पुरूष यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी महिला व पुरूष शहर पोलीस ठाण्यात आले असता त्याचवेळी मारहाण करणारे चौघे देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि पुन्हा पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण करण्यास सुरूवात केली. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात हजर असलेले कर्मचारी पोउनि अरूण सोनार, महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडरे, मपोकॉ संगिता इंगळे, मनिषा चव्हाण यांनी सुरू असलेले भांडण सोडविले. पो.कॉ. भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नाजीमखॉ कादिरखॉ पटवे (वय-३०), फरिदाबी जुबेर खान (वय-३५) दोन्ही रा. गेंदालाल मिल, सिकंदर उस्मान खान (वय-३९), शोभा मुकेश पवार (वय-३५) दोन्ही रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र सोनार करीत आहे.








