जळगाव;- दुचाकींचा कट लागल्याने वाहन व्यवस्थित चालवा असा सल्ला दिल्याने रंगाच्या भरात दोघांनी दुसऱ्या दुचाकीवरील दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना १८ रोजी रात्री घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , अमोल चौधरी (वय-४९) रा. खेडी हे १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अमोल चौधरी हे सालदार दारासिंग पावरा याच्यासोबत (एमएच १८ वाय ७८८६) क्रमांकाच्या दुचाकीने शेतावर जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यावर अमोल चौधरी यांनी गाडी व्यवस्थीत चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी भुषण सपकाळे आणि प्रविण सपकाळे रा. खेडी बु॥ ता.िज.जळगाव यांनी अमोल चौधरी यांचा रस्ता आडवून भुषण सपकाळेने शिवीगाळ केली व लाकडी दांडुक्याने बेदम मारहाण केले. यात अमोल चौधरी व सालदार पावरा दोघे जखमी झाले. दोघांनी उपचार घेतल्यानंतर रविवारी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अमोल चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.








