• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला : डॉ. शिवाजी काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला : डॉ. शिवाजी काळे

जळगावात एक दिवसीय मराठी गझल संमेलन उत्साहात

विविधांगी मुशायऱ्यांच्या कार्यक्रमांनी आणली रंगत

जळगाव (प्रतिनिधी) : कविवर्य व गझलसम्राट सुरेश भट यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे. गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार आहे. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे, असे प्रतिपादन गझलकार डॉ. शिवाजी काळे (राशीन जि. अहमदनगर) यांनी जळगावात एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे उदघाटक म्हणून केले.

महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे जळगाव येथे रविवार दि. १० मार्च रोजी खान्देश विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. मंचावर जळगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील हे संमेलनाध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून गझलकार निलेश कवडे (अकोला) हे तर संदीप वाकोडे(मूर्तिजापूर), उर्मिला बांदिवडेकर, सच्चीदानंद जाधव, युवराज माळी हे उपस्थित होते.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले, देवी सरस्वती, गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी माल्यार्पण केले. गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केले जात आहेत, अशी माहिती प्रास्तविकेतून संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली.

संमेलनात जळगावचे कवी ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांचा “फुलला सुगंध प्रेमाचा..” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेम या एकाच विषयावर आधारित विविध ९५ कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे. या संग्रहाला प्रसिद्ध गझलकार व साहित्यिका उर्मिला बांदिवडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. संमेलनात त्यांनी याविषयी माहिती सांगितली. शिरपूर येथील अनिता खैरनार यांना “गझल यात्री सन्मान” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर उदघाटक डॉ. शिवाजी काळे यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त केले. तसेच, संदीप वाकोडे यांनी मार्गदर्शन केले.

संमेलनाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी, गझल हा कष्टसाध्य काव्यप्रकार आहे. गझल शिकण्यासाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकांची आवश्यकता असते असं सांगून, कालानुरूप आधुनिक गझलेचा लोकाभिमुख लहेजा आणि बदललेला आशयविषय याविषयी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन काशिनाथ गवळी यांनी करून आभार मानले. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, खान्देश विभाग अध्यक्ष काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष अॅड. मुकुंदराव जाधव, बाळासाहेब गिरी, यशश्री रहाळकर, अतुल देशपांडे यांचेसह जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, शिवाजी साळुंखे, मंजुषा पाठक, सुदाम महाजन, डॉ. शकुंतला चव्हाण यांच्यासह खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे परिश्रम घेण्यात आले.

दुपारच्या ६ सत्रांत रंगले मुशायरे
संमेलनाच्या उदघाटनानंतर विविध सहा सत्रांत मुशायरा घेण्यात आला. गझलकार डॉ. कैलास गायकवाड, विजय वडवेराव, रावसाहेब कुवर, विजय पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, वीरेंद्र बेडसे या नामांकित गझलकारांनी विविध सत्रात संपन्न होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविले. गझलकार राज शेळके, संदीप पटेल, डॉ. कुणाल पवार, छाया सोनवणे, आशा साळुंके, ज्योती वाघ यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १०० पेक्षा अधिक गझलकार सहभागी झाले होते. तुम्ही चांगली गझल लिहिली तर आम्ही तिला संगीतबद्ध करून ती रसिकांपुढे घेऊन येऊ. तुमच्या उत्तमोत्तम गझला रसिकांच्या ओठांवर रूळतील. आपल्याला जे अभिव्यक्त व्हायचे आहे, ते आतून स्फुरले पाहिजे. मात्रा नुसार शब्द लिहिता आले पाहिजे. त्यानुसार ओळ बनवता आली पाहिजे. मग गझल बनायचा प्रवास सुरू होतो, असे मार्गदर्शन विविध सत्रांत अध्यक्षांनी व्यक्त केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/marathmolapana-gazalane-japla/
Previous Post

श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात काल्याचे कीर्तनाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप

Next Post

ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त शवविच्छेदन कक्षाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon