मराठा क्रांती मोर्चाची मागणी
पाचोरा (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाले म्हणून शिवसेना शिंदे गटाने आयोजित आभार मेळाव्यात मराठा आरक्षण या महत्वपूर्ण विषयाला पिल्लू म्हटल्याने मराठा क्रांती मोर्चाने आ. किशोर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले म्हणून आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात भाषणात आ. किशोर पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचा कपाशीचा मुद्दा हा पिल्लू म्हणून वापरला जाईल असे बोलल्याचे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. यावरुन मराठा आरक्षण बाबत सत्तेत सहभागी असलेल्या आ. किशोर पाटील यांच्या सह महायुतीची भुमिका आणि गांभीर्य लक्षात येते. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून आ. पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे सांगितले. आ. पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी शेवटी मागणी केली आहे