जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेने मुंबई – नागपुर दुरंतो विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई –गोंदिया विशेष गाडी ही विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील
मुंबई – नागपुर दुरंतो विशेष गाड़ी (क्रमांक – 02289), डाउन मुंबई – नागपुर दुरंतो विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दि. 10 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिदिन 20.15 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी नागपुरला 07.20 वाजता पोहचेल. भुसावळ येथे रात्री २ वाजता पोहोचेल.
गाड़ी (क्रमांक – 02290) अप नागपुर – मुंबई दुरंतो विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दि. 9 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिदिन 20.40 वाजता रवाना हुन दुसऱ्या दिवशी मुंबई ला 08.05 वाजता पोहचेल. भुसावळ येथे रात्री १. २० वाजता पोहोचेल.
या गाडीची रचना पुढील प्रमाणे – 8 शयनयान श्रेणी, 9 वातानुकूलित तृतीय श्रेणी , 2 वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी
तसेच गोंदिया – मुंबई विशेष गाड़ी, (क्रमांक – 02106) अप गोंदिया – मुंबई विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दि. 10 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिदिन 15.00 वाजता रवाना हुन दुसऱ्या दिवशी मुंबई ला 07.00 वाजता पोहचेल .
गाड़ी (क्रमांक – 02105) डाउन मुंबई – गोंदिया विशेष गाड़ी ही प्रस्थान स्टेशन पासून दिनांक – 09ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिदिन 19.05 वाजता रवाना हुन दुसऱ्या दिवशी गोंदिया ला 11.20 वाजता पोहचेल. या गाडीचा थांबा – ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा असा आहे. तर, सरंचना – 10 शयनयान श्रेणी ,5 वातानुकूलित तृतीय श्रेणी , 3 वातानुकूलित द्वितीय श्रेणी , 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी ,5 सेकंड क्लास सीटिंग अशी राहील., आरक्षण : विशेष ट्रेनचे बुकिंग 08ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.