नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत अजय भास्कर विश्वे (वय २९) परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी पाहूणे आलेले होते. त्यावेळी आलेले पाहूणे हे मन्यारखेडा येथील सोपान राजपूत आणि सपना सोपान राजपूत दोन्ही रा. साईनगर, मन्यारखेडा शिवार, जळगाव यांच्याकडे गेले. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अजय विश्वे हा आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी सोपान राजपूत यांच्याघरी गेले.
याचा राग आल्याने सोपान राजपूत आणि सपना राजपूत या दोघांनी अजयला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी अजय विश्वे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.