पहा मोदींच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी आणि सरकारमधील मंत्र्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा निवडणुका जिंकल्या आहेत. शपथविधीनंतर कोणत्या मंत्र्यावर कोणत्या खात्यांची जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होती. राजकीय वर्तुळातील प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज बांधत होती. ती यादी आता समोर आली आहे. काही नेत्यांकडे आधीचीच महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री आहेत. 24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अनुभवी नेत्यांसह कमी वयाच्या खासदारांचाही समतोल साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
१) नरेंद्र मोदी – पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
२) राजनाथसिंह – संरक्षण मंत्रालय
३) अमित शहा – गृह मंत्रालय
४) नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्रालय
५)एस. जयशंकर- परराष्ट्रमंत्री
६) शिवराजसिंह चौहान- कृषी व शेतकरी कल्याण आणि पंचायत व ग्रामीण विकास मंत्रालय
७) निर्मला सीतारामन – अर्थ मंत्रालय
८) जे.पी नड्डा- आरोग्य मंत्रालय
९) मनोहर लाल खट्टर- ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय
१०) एच. डी. कुमारस्वामी- अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय
११) पियुष गोयल- उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय
१२) धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्रालय
१३) जीतनराम मांझी- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
१४) राजीवरंजन सिंह (लल्लन सिंह) (जेडीयू)
१५) सर्वानंद सोनोवाल- बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय
१६) डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय मंत्रालय
१७) किंजरापू राममोहन नायडू- नागरी विमान वाहतूक
१८ ) प्रल्हाद जोशी- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
१९) ज्योएल ओरांग- आदिवासी व्यवहार मंत्रालय
२०) गिरीराज सिंह- वस्त्रोद्योग मंत्री
२१) अश्विनी वैष्णव- रेल्वेमंत्री
२२) ज्योतिरादित्य शिंदे- ईशान्य (नॉर्थ इस्ट) विकास आणि दूरसंचार मंत्रालय
२३) भूपेंद्र यादव- पर्यावरण मंत्रालय
२४) गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक पर्यटन
२५) अन्नपूर्णा देवी- महिला व बालविकास मंत्रालय
२६) किरेन रिजीजू- संसदीय कामकाज
२७) हरदीपसिंह पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
२८) डॉ. मनसुख मांडवीय- कामगार मंत्रालय
२९) जी. किशन रेड्डी- कोळसा आणि खाण मंत्रालय
३०) चिराग पासवान- क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय
३१) सी. आर. पाटील- जलशक्ती मंत्रालय
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
३२) राव इंद्रजितसिंह- पर्यटन राज्य मंत्रालय
३३) डॉ. जितेंद्र सिंह- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
३४) अर्जुन राम मेघवाल- कायदा आणि न्याय मंत्रालय
३५) प्रतापराव जाधव- आयुष, आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालय
३६) जयंत चौधरी- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
राज्यमंत्री
जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
श्रीपाद नाईक – ऊर्जा
पंकज चौधरी – अर्थ
कृष्णा पाल – सहकार
रामदास आठवले – समाजिक न्याय आणि अधिकारीता
रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी विकास
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामिण विकास आणि दळणवळण
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक
रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण