पाळधी (प्रतिनिधी) – मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबरावजी पाटील हे चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजनासाठी चांदसर येथे आलेले असता चांदसर, कवठळ गावातील 150 शेतकऱ्यांनी चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याची दुरवस्था झालेली आहे अशी तक्रार केली.

सर्वत्र काटेकुटे वाढले आहेत, यामुळे रस्ता नसल्यामुळे कोणाच्या बांधावरून बैलगाडी, ढोरे नेल्यास दररोज वाद होतात. शेतकऱ्यांना खते वाहून नेण्यास अडचण होते. पीक तयार झाल्यास शेतातून घरी आणण्यास मोठे हाल होतात. सुमारे 200 ते 250 शेतकऱ्यांना याबाबत त्रास होत आहे असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी मंत्रीमहोदयांकडे मांडले. त्यावेळी मंत्रीमहोदयांनी 8 दिवसात रस्त्याचा प्रश्न स्वखर्चातून मार्गी लावू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी चांदसर गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, नाना कोळी,आधारमामा,जगनशेठ वाणी,वाय,डी.पाटील, पंढरीनाथ साळुंखे, तुकारामभाऊ कोळी,मच्छुआबा,पिंटु चौधरी, समाधान कोळी, नाना शिंदे,महेश पवार आबा शिंदे, समाधान शिंदे, शेखर साळुंखे, अरूण चौधरी,भिकन शिंदे, भिमराव मोतीराया,दिलीप पाटील, उत्तम पाटील, गोरखभाऊ कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.








