जळगाव (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संवेदनशील आणि सेवाभावी स्वभावाचे आणखी एक उदाहरण दाखवले. असोदा येथील माजी उपसरपंच सुभाष पोपटराव माळी यांचा जळगावहून आसोदा गावाला जात असताना रात्री अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला तत्काळ विराम दिला आणि अत्यंत तातडीने जळगाव येथील हॉस्पिटल गाठले.
सुभाष माळी यांच्या प्रकृतीची त्यांनी आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना आधार देऊन मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले की, सुभाष माळी यांना उत्तम उपचार मिळतील आणि त्यांची तब्येत लवकरच सुधारेल. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
“आम्ही एक कुटुंब आहोत, कोणत्याही संकटात एकमेकांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे सांगून गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांचे हृदय जिंकले. त्यांच्या या कृतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत जितेंद्र गवळी , दिपक माळी, विशाल निकम, तुषार महाजन, अजय महाजन, महानगर प्रमुख संतोष पाटील आदी उपस्थित होते.