जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्यांच्या मागणीसाठी शहर मनसेने आज महापालिकेसमोर झोप काढा आंदोलन केले. आठवडाभरात रस्त्यांची सर्वत्र कामे सुरु न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा आज देण्यात आला.
शहरात सर्वत्र रस्त्यांची भयानक दुर्दशा झाली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आज करण्यात आले . मनसेचे रस्ते , सुविधा आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम आणि आंदोलनकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात ३ वर्षांपासून रस्त्यांचे आणि भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे पावसाळ्यात खराब रस्त्यांच्या त्रासाने सगळेच वैतागले आहेत यापूर्वीही या मागणीसाठी महापालिकेला निवेदने दिली आहेत. महापालिका सांगते की पैसे नसल्याने रस्त्यांची कामे होऊ शकत नाहीत वसुलीची सगळी रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते. सरकारकडून मिळणार निधी आणि स्थानिक वसुली कुठे जाते ? हा प्रश्न आता लोक विचारात आहेत.
मनसेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे यांनी सांगितले की , वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही महापालिका रस्त्यांबद्दल काहीच करत नाहीय प्रशासन झोपेत आहे. त्यांना जाग यावी म्हणून आज हे झोप काढा आंदोलन केले. आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास पुन्हा जनतेला सोबत घेऊन अनोखे आणि तीव्र आंदोलन आम्ही करू लोक कर देतात त्यामुळे रस्त्यांसह सगळ्या सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलने सुरूच ठेऊ.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे , मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे , जळगाव तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे, संदीप मांडोळे, संदीप महाले, संदीप पाटील , अविनाश पाटील, इमाम पिंजारी , सतीश सैंदाणे , विकास मिस्तरी , विरेश पाटील, चेतन आंढळकर , अविनाश जोशी , महेश सोनवणे , जिल्हा संघटक राजेंद्र निकम , राजू बाविस्कर , महेश माळी , गणेश नेरकर, गोविंद जाधव , विशाल कुमावत , निलेश अजमेरा , संतोष सुरवाडे , रमेश भोई , मनोज खुले, निलेश खैरनार , अँड. दिनेश चव्हाण , मंगेश भावे , सिद्धेश कवठाळकर , गोरख गायकवाड आदींची नावे आहेत.







