जळगाव ( प्रतिनिधी )- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून कोरोना नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन केल्याचे आढळून येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार गर्दीच्या ठिकाणावर कारवाई करण्यात येत आहे . मनपाच्या विभागाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डी मार्ट व आदित्य फार्म यांना नोटीस बजावली असून २४ तासांच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे.
उपायुक्त शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिकेच्या पथकाने २६ जानेवारी रोजी शिरसोली रोडवरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली यावेळी शंभर पेक्षा जास्त ग्राहक आढळून आले. यातील अनेकांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन न केल्याचे दिसून आले. तर आदित्य फार्म येथे २७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी असतांना या समारंभात २०० नागरिक सहभागी झाले असल्याचे आढळून आले. याठिकाणी देखील कोरोना नियमांचे पालन न झाल्याचे आढळून आले.वरील दोन्ही संस्थान प्रत्येकी ५० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल का करण्यांत येवु नये ? प्रतिष्ठान सील का करण्यात येऊ नये अशी नोटीस आज ३१ जानेवारी रोजी बाजवण्यात आली आहे.