जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप
जळगाव (प्रतिनिधी ) शहर महापालिकेत प्रलोभने दाखवून सत्तांतर झाले. महापौर आणि विरोधी पक्षनेतेपद एकाच पक्षात कसे काय राहू शकतात असा सवाल जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला असून नैतिकतेच्या आधारे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून महापौर यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी राहून सुनील महाजन यांनी नैतिकता बासनात गुंडाळली आहे. हे ५ लाख जळगावकर जनतेच्या हितासाठी नाही . सत्तेत शिवसेना आहे .गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत विरोधी पक्षनेतेपदी असताना जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर आवाज उठविला आहे का ? . मनपातील कोणता प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे का ? कोणत्या विषयावर महाजन यांनी चर्चा केली आहे का ? समितीमध्ये महापौरांचा समावेश व्हावा अशी सुनील महाजन यांनी मागणी केली. लाखो रुपयांचे टेंडर प्रक्रियेत महाजन दाम्पत्यांनी ते मंजूर केला असल्याचा आरोप केला आहे. टेंडर प्रक्रियेत महापौर आणि उपमहापौरांची शिफारस , हा अट्टहास कशासाठी ? असा सवालही डॉ. चौधरी यांनी केला आहे. जनतेचे रक्षकच हे भक्षक झाल्याचा आरोप देखील डॉ. राधेशाम चौधरी यांनी केला आहे.