नववर्षात शिवसेनेची धडाकेबाज सुरुवात, सलग दुसरे यश
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाला चांगले यश मिळाले आहे. सलग दुसरे यश आले असून दुसरे उमेदवार प्रभाग ९ अ मधील मनोज सुरेश चौधरी बिनविरोध निश्चित झाले आहेत. अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने हे चित्र स्पष्ट झाले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून येत नाही असेच चित्र आता निर्माण झाले आहे. महायुतीमधील ३ नगरसेवक बिनविरोध निश्चित झाले आहे. बुधवारी संध्याकाळी १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वलाताई बेंडाळे बिनविरोध निश्चित झाल्यावर आता गुरुवारी सकाळी शिवसेनेचे १८ अ मध्ये डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर सोनवणे यांच्या माघारीमुळे बिनविरोध निश्चित झाले.आता दुपारी २ वाजता ९ अ मध्ये अपक्ष उमेदवार राहुल अशोक लोखंडे यांनी माघार घेतली असल्यामुळे मनोज सुरेश चौधरी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. विजयानंतर महापालिकेत मनोज चौधरी व समर्थकांनी जल्लोष साजरा केला.









