जळगांव (प्रतिनिधी) – राजंनंदिनी बहुउद्धेशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण नुकतेच करण्यात आले प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक व राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज भालेराव यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यांनी प्रगती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतले आहेत. वृक्षारोपण, राखी व साबण बनवणे, विज्ञान कृतीतून, प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, क्रीडा व निबंध स्पर्धा आयोजन केले त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित आहे.
त्यांना या अगोदरसुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध संस्थानी सन्मानीत केले आहे.हा पुरस्कार मिळाल्यानंतर विधावर्धिनी शिक्षण संस्था, राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी, राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ तसेच शिक्षक मित्रपरिवार यांच्याकडून व पालकवर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे.







