डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेतंर्गत उपचार
जळगाव (प्रतिनिधी) – मागील चार वर्षापासून मणका विकार असून पायावर चालणे अवघड झालेल्या ६० वर्षीय रुग्णाला डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मार्थ रूग्णालयात करण्यात आलेल्या मणका शस्त्रक्रियेने आराम पडला असून आज रुग्ण स्वतःच्या पायावर चालत आहे.
याबाबत अस्थिरोग विभागातील निवासी डॉ. चाणक्य यांनी माहिती दिली की, सदर रुग्ण येथे आला असता तो व्हीलचेअर वर आला होता. त्याच्या लक्षणानुसार सर्वप्रथम ाीळ करून घेण्यात आला त्यात रुग्णाला कमरेच्या मणक्यातील गादी मागे सरकली असल्याचे निदान झाले. त्यामुळे रुग्ण कंबरदुखी, पायदुखी, हाता पायाला मुंग्या येणे या समस्येने बेजार झाला होता. अशा रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असते. त्यानुसार मणका विकार शल्य चिकित्सक डॉ प्रमोद सारकेलवाड यांनी भुल रोग तज्ञ डॉ देवेंद्र चौधरी, डॉ शीतल यांच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली. तसेच निवासी डॉ चाणक्य, पियूष, गौतम यांचेही अनमोल सहकार्य लाभले.
फिजिओथेरपी लाभदायी
रूग्णालयात एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यात फिजिओथेरपीचाही समावेश आहे. सदर रुग्णाला शस्त्रक्रिये नंतर फिजिओथेरपिस्ट डॉ सौरभ पाटील यांनी व्यायाम शिकवले. त्यामुळे रुग्ण लवकरच बरा होऊन चालू लागला. …योजना रुग्णांसाठी लाभदायी मणका शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले योजनेत मोफत केल्या जातात. त्याकरिता रुग्णांनी सोबत येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. मोफत उपचारामुळे ही योजना रुग्णांसाठी लाभदायी ठरतेय.
मी खूप आनंदी आहे – शब्बीर मोहंमद बागवान
बर्याच वर्षापासून मी २० ते २५ मीटर देखील चालू शकत नव्हतो. अनेक खाजगी रुग्णालयात गेलो मात्र काही उपयोग झाला नाही. शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. तरी पुन्हा चालता येईल ही शश्र्वाती दिली जात नव्हती मात्र येथे डॉक्टरांनी हमी घेतली आणि आज मी खरोखर माझ्या पायावर चालू शकत आहे. योजनेत माझ्यावर उपचार झाले असून केवळ ाीळ चा खर्च आला. मी आता पुन्हा चालू शकेल हा विचार सोडून दिला होता परंतु डॉ उल्हास पाटील रूग्णालयात ते शक्य झाले. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
– शब्बीर मोहंमद बागवान, बरा झालेला रुग्ण
शस्त्रक्रियेद्वारे दिनचर्या सुरळीत : डॉ प्रमोद सारकेलवाड
(स्पाईन व जॉईंट रिप्लेसमेंट तज्ञ)
मणका विकारात सर्वप्रथम औषधी-गोळ्या देवून उपचार केले जातात. परंतु औषधींचा परिणाम होत नसल्यास आणि दुखणे दीर्घकाळापासून (जुनाट) असेल, अशावेळी मणका शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. अशा शेकडो रुग्णांवर येथे मणका शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची दिनचर्या सुरळीत झाल्याचे स्पाईन व जॉईंट रिप्लसमेंट तज्ञ डॉ.प्रमोद सारकेलवाड यांनी सांगितले.