जळगाव (प्रतिनिधी ) – सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मनीषा प्रदीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शहरातील निवृत्ती नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या मनीषा चौधरी यांच्या निवडीमुळे समाजाला नवा उत्साह मिळाला आहे.
नंदुरबार येथे नुकतीच प्रदेश तेली महासंघाची बैठक पार पडली. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वानुमते मनीषा प्रदीप चौधरी यांची महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, तसेच विनोद चौधरी, सारिका चौधरी, योगिता चौधरी, स्वप्निल चौधरी, धनंजय चौधरी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनीषा चौधरी यांच्या निवडीबद्दल समाजातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.









