जळगाव (प्रतिनिधी) – येथील युवाचार्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री मनीष भाऊ लुंकड़ यांच्या वाढदिवसा निमित्त बालाजी मेडिकल, ख़्वाजामिया दरगाह जवळ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला त्यात डॉक्टर सिद्धार्थ उत्तम चौधरी दंतरोग तज्ञ डॉक्टर शशांक उत्तम चौधरी लहान मुलाची दंतत्तज्ञ व डॉक्टर प्रियंका शशांक चौधरी नेत्ररोग तज्ञ यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली यात जवळपास 400 रुग्णांनी सहभाग नोंदवला.परम पूज्या श्री विभक्तिश्रीजी म.सा.यांच्या माँगलिकाने कार्यक्रमाची शुरुवात करण्यात आली.संघपति श्री दलुभाऊ जैन यांनी उपक्रमाची सराहना करत मनिषभाऊंना शुभेच्छा दिल्या.

आ. राजुमामा भोळे यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.पाहुण्याचे स्वागत प्रदीप श्रीश्रीमाळ, प्रवीण धाड़ीवाल,विजय सांड यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने मित्र परिवार नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते तसेज समाज बांधव उपस्थित होते. सूत्र संचालन सचिव प्रकाश कटारिया यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश डाकलिया यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदकुमार जैन,अशोक कोठारी,विनोद कोचर,प्रियेश छाजेड,राजेश भंडारी,नंदलालजी जैन,विजय खींवसरा,सुभाष रायसोनी सौ सविता कोठारी,सौ विनीता कुमट आदि सदस्यानी परिश्रम घेतले.