आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांवर नामोल्लेख टाळून गंभीर आरोप
चाळीगाव (प्रतिनिधी) : दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून माझी ओळख आहे. उलट विरोधकांनी शब्द पाळले नाही. खरे बोलणे त्याच्या रक्तात नाही. कुठल्याही मुद्द्यावर जा, मात्र त्यांनी केवळ खोटे बोलण्याचे काम केले. दिलेली आश्वासने न पाळणारा आमदार म्हणून विरोधकांवर आ. मंगेश चव्हाण यांनी तोंडसुख घेतले. एक माणूस तुम्हाला तालुक्यात चांगले बोलत नाही. सर्व तालुका तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहत आहे, अशा शब्दात आ. मंगेश चव्हाण यांनी नामोल्लेख टाळत विरोधी उमेदवार माजी खा. उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली.
चाळीसगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले कि. एमआयडीसीत सर्व उद्योजकांना त्रास देण्याचे काम या माणसाने केले. नोकरीच्या नावाने पैसे घेतले. टेक्स्टाईल पार्क आणण्याचे, गणित नगरी करण्याचे आश्वासने दिली. पाटणादेवी येथे पुलाचे हाल झाले. हि पाटणादेवी देखील कोपल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आ. मंगेश चव्हाण यांनी विरोधी उमेदवार उन्मेष पाटील यांचे नामोल्लेख न घेता टीका केली.
नगरपालिकेत दिशाभूल केली. चांगले काम यांनी केले नाही. खालच्या स्टरावरील पाताळयंत्री माणूस म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. व्यापाऱ्यांविषयी भावना चांगली ठेवत नाही, अशा शब्दातहि आ. चव्हाण यांनी घणाघात केला. मला सांगितले, ५ कोटी रुपयांचा हा चौक आहे. भाडोत्री माणसांच्या हातून काय आरोप करतो, हिम्मत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ये, नाही तुला चौकात उत्तरे दिली तर नावाचा मंगेश चव्हाण नाही, अशा शब्दातही आ. चव्हाण यांनी टीका केली.