जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातल्या पिंप्राळा येथे भरणाऱ्या आठवडे बाजारातून एका महिलेचे ५० हजार किंमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कल्पना संजय पाटील वय ३० या भिकमचंद जैन नगर परिसरातील वाघोदे नगरमध्ये राहत असून त्या बुधवारी बाजार करण्यााठी पिंप्राळ्याच्या बाजारात गेल्या असत्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने . याबाबत त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक राजेश् चव्हाण हे करीत आहेत.