जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील ममुराबाद रोडवरून दुचाकीने घरी येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दांपत्यासह १७ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. जखमी झालेल्या तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरातील पिंप्राळा भागात राहणारे संतोष दगडू महाजन (वय-४२) हे परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने सोमवारी दि. २५ नोव्हेंबर रोजी ते बाहेरगावी दुचाकीने गेलेले होते. आपले खाजगी काम आटपून ते पत्नी नलिनी संतोष महाजन (वय-४०) आणि मुलगा शुभम संतोष महाजन (वय-१७) यांच्यासोबत दुचाकीने जळगाव शहरात येत होते. तेव्हा दुपारी ४ वाजता ममुराबाद रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संतोष महाजन यांच्यासह त्यांची पत्नी नलिनी महाजन व मुलगा शिवम महाजन हे जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरु होते.