कोलकता (वृत्तसंस्था ) ;– तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचं हे सलग त्यांचं तिसरं वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील.
आजच्या घडीला ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असंही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.