जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी भागातील हॉटेल त्रिमृर्ती शेजारील कंम्पाउडमधून १ लाख रूपये किंमतीचे पी.पी. मल्टीफिलामेन्ट धाग्यांचा २० बंडलाचा अपहार केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूर येथील एस.एस. ट्रान्स लॉजीस्टीक यांच्या ट्रान्सपोटवरून राम पॉलीथ्रेड कंपनीच्या मालकीचे पी.पी. मल्टीफिलामेन्ट धाग्याचे २९१ दोऱ्याचे बंडल जीजे ०५ बीक्स ३८३३ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले होते. हा माल आयशर ट्रकचालक जगदीश देवचंद राठोड (रा. गाळण ता. पाचोरा ) याच्याद्वारे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी सुरत येथे रवाना केला. दरम्यान आयशर ट्रकचालक जगदीश देवचंद राठोड याने ६ सप्टेंबररोजी दुपारी ट्रक व त्यातील माल हा जळगाव औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल त्रिमुर्ती शेजारील असलेल्या कंम्पाऊड येथे सोडून दिला आणि ट्रकमधील १ लाख रूपये किंमतीचे २० धाग्याचे बंडल घेवून निघून गेला. सतबीर रामनिवास शर्मा (वय-५५, रा. सुरक्षानगर, अमरावती ) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात जगदीश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.