माळपिंप्री ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव कृषिदूताव्दारा देवपिंप्री आणि माळपिंप्रीत कृषी मेळावा आयोजित करण्यात आला यास शेतकर्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.



मेळाव्यास (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ,जामनेर) मा. श्री. सुभाष अहिरे सर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिता ज्ञानेश्वर पाटील (सरपंचा माळपिंप्री), डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रमुख उपस्थिती मा.संजय रमेश पाटील (उपसरपंच देवपिंपरी) , मा.धनंजय रामधन पाटील (पोलीस पाटील माळपिंपरी), प्रमुख मार्गदर्शक मा. भागवत किसन चिमकर ( मंडळ कृषी अधिकारी जामनेर) , प्रा.एन.बी.सदर सर ( वनस्पती शास्त्र विभाग ) (डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव) मा. मिलिंद पाटील सर ( सहाय्यक कृषी अधिकारी), मा. शरद सुरडकर (सहाय्यक कृषी अधिकारी देवपिंपरी) , मा.राहुल बावस्कर(सहायक कृषी अधिकारी माळपिंपरी), मा.जगदीश पाटील (विनय ऍग्रो माळपिंपरी), मा. बापू काळबैले , मा. किरण भाऊ पाटील, मा.रवी हडप (उपसरपंच पळसखेडे) , मा.दीपक डोंगरे (प्लांटो कंपनी प्रतिनिधी),मा.पंकज पाटील (आयडियल कंपनी प्रतिनिधी),मा. प्रज्वल देशमुख ( कृषी पदवीधर),प्रा. व्हि. एस. पाटील (कार्यक्रम अधिकारी) आणि प्रा. बी. एम.गोणशेटवाड सर (कार्यक्रम समन्वयक डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव) मंचावर उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीदूत सुशांत शंकर जाधव आणि श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने यांनी केले. मेळाव्याची प्रस्तावना प्रा.बी.एम.गोणशेटवाड सरांनी केली. त्यानंतर कृषीदूत अमन मोगल आणि कृषी कन्या नेहा बाविस्कर यांनी मेळाव्याच्या विषयाबद्दल शेतकर्यांना माहिती दिली. मेळाव्याला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी. एम.गोणशेटवाड, प्रा. व्ही. एस. पाटील,वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. एन.बी. सदार,( सहाय्यक कृषी अधिकारी) मा. श्री. मिलिंद पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी माळपिंपरी) मा. श्री. राहुल बावस्कर,मा. श्री. दीपक डोंगरे मा. बाप्पू काका काळबैले,पळसखेडे गावचे उपसरपंच मा. श्री. रवी हडप, कृषी मेळाव्याचे उद्घाटक (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जामनेर) मा. सुभाष अहिरे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आणि विद्यार्थी मित्रांना शाश्वत शेती आणि समृद्ध शेती,टरबूज लागवड तंत्रज्ञान,टरबूज लागवड कशी करावी आणि त्याचे उत्पन्न ,महाविस्तार आधुनिक हे शेतकर्यांना शेतीमध्ये कसे उपयोगी ठरेल याबद्दल मोलाचे मार्गदर्शन दिले. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय ,जळगाव येथील (कार्यक्रम समन्वयक) प्रा. बी.एम.गोणशेटवाड यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप दिला.









