जळगाव ( प्रतिनिधी ) – रावेर लोकसभा मतदारसंघात मलकापूर विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून निवडणुकीत या मतदारसंघाची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यादृष्टीने मलकापूर मतदारसंघातील बुथ रचनेच्या नियोजनावर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मलकापूर येथील नेते डॉ. अरविंद कोलते, नगरसेवक तथा मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू पाटील आणि अभिजीत यांच्याशी चर्चा करण्यात आली.
रावेर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर असे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद असून काँग्रेससाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे. त्यामुळे मलकापूरचे माजी नगराध्यक्ष तथा डॉ. अरविंद कोलते, नगरसेवक राजू पाटील यांनी आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. या भेटीत मलकापूर विधानसभा मतदारसंघातील बुथ रचनेबाबत चर्चा करण्यात आली असून बुथनिहाय नियोजन केले जात आहे.