राज्यभरातील पालकांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : – येथील माळी समाज जळगाव जिल्हा आयोजित माळी बंधन वधू-वर मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात घेण्यात आला. यावेळी राज्यभरातून ४००पेक्षा अधिक विवाहेच्छूक वधूवरांनी आपला परिचय करून दिला. यावेळी मेळाव्यात तीन लग्न जुळले आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळ येथील समाजाध्यक्ष कैलास महाजन होते. प्रमुख मान्यवर आ.राजूमामा भोळे,भाजपा नेते उद्धवराव महाजन, विष्णू भंगाळे, नाना महाजन, ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनाचे गुलाबराव वाघ, डिगंबर माळी, उद्योजक संतोष इंगळे, कैलास महाजन, गजेंद्र महाजन, चाळीसगावचे ज्ञानेश्वर महाजन, आदित्य महाजन, आयोजक प्रशांत महाजन उपस्थित होते. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ. राजूमामा भोळे यांनी, समाजातील वधू-वरांनी अधिकाधिक विवाह जुळण्याबाबत शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील घटस्फोटाचे प्रमाण कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीहि मनोगत व्यक्त केले. उद्योजक संतोष इंगळे यांनी, समाजात शेतकरी व व्यावसायिक मुलांना पालक मुली देण्यास नकार देतात. मात्र याबाबत कुठेतरी सकारात्मक विचार करणे अपेक्षित आहे असे मत मांडले
समाजाध्यक्ष कैलास महाजन यांनी पालक व वधू वरांना समाजातील विवाह संदर्भात असणाऱ्या उणिवा आणि लग्नकार्य यासंदर्भामध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत महाजन यांनी केले. संपूर्ण जळगाव जिल्हा व मध्य प्रदेशामधून वधूवरांनी उपस्थिती दिली होती. सूत्रसंचालन कृष्णा माळी यांनी केले आभार प्रशांत महाजन यांनी मानले. कार्यक्रमाकरिता हर्षल इंगळे, हेमंत महाजन, कुलदीप थोरात, समीक्षा महाजन आदींनी परिश्रम घेतले.