धरणगाव शहरातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मलेरिया विभागाच्या डॉक्टरने गुरुवारी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. प्रदीप पंढरीनाथ महाजन (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, वडील असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जळगावकडे जात असलेल्या रेल्वे मालगाडीखाली त्यांनी आत्महत्या केली. शहरातील विविध भागात मलेरियाची तपासणी तसेच विविध शिबिरात त्यांचे मोलाचे योगदान होते. कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांना तापाची औषधी देऊन सहकार्याची भूमिका निभावली. येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ लोटन महाजन यांचे ते पुत्र होत. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.