भुसावळ ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक निवडणुकीत भुसावळातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. ते अपिल फेटाळल्यानंतर त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेत अपिल दाखल केले.
आता निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी होऊन निकाल लागणे अपेक्षित आहे . माजी आमदार संतोष चौधरी मैदानात आहेत असेच समजून त्यांचे प्रतिस्पर्धी आता कामाला लागले असल्याची चर्चा आज भुसावळात होती.