पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्याचे माजी आमदार लोकनेते ओंकार वाघ यांना ९ व्या स्मृतिदिनी आज आदरांजली वाहण्यात आली शक्तीस्थळाला माजी आमदार दिलीप वाघ व पी टी सी चेअरमन तथा पाचोरा नगरपालिकेचे गटनेते संजय वाघ यांनी अभिवादन केले.
यावेळी आरोग्य शिबिराचे व रक्त तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. शांताराम चौधरी, विकास पाटील, खलील देशमुख, नितीन तावडे यांनी आप्पासाहेब यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात केलेलं योगदानाच्या आठवणीना उजाळा दिला यावेळी पिटीसी व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी , स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन दगाजी वाघ , राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व नगरसेवक विकास पाटील , प्रकाश पाटील, नाना देवरे , माजी सरपंच मधुकर वाघ , भोला चौधरी, अजयअहिरे , बुऱ्हाण तडवी, उपसरपंच शशिकांत वाघ, अली मेवाती, प्रदीप वाघ, जगदीश वाघ, भाऊसाहेब पाटील, सदाशिव नरवाडे, नामदेव पाटील, बारकू वाघ, सुभाष शिंदे, सुधाकर शिर्के, राजेंद्र सोनार, रविंद्र पाटील, उदाराम बडगुजर, प्राचार्य पी एन पाटील, प्राचार्य गायकवाड, विश्वास साळुंखे , प्राचार्य डी व्ही पाटील , मुख्याध्यापक सुधीर पाटील , बोरुडे , नागणे , पर्यवेक्षक जी. एन. पाटील , पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, व्हा. चेअरमन, सभासद उपस्थित होते.