महाराष्ट्र सुवर्णकार सेना आणि सोनार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव – माजलगाव येथे घडलेल्या लहान चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा आणि जळगाव शहरातील समस्त सोनार समाजातर्फे आज दिनांक १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या गंभीर घटनेतील दोषींना तत्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय बाबुराव विसपुते, उपाध्यक्ष विजय केशव वानखेडे, सचिव संजय नथु पगार, बबलू अरुण बाविस्कर, राजेंद्र गंगाधर दुसाने, संजय टी. दुसाने, मनोज सुकलाल सोनार, प्रशांत त्र्यंबक विसपुते, गोकुळ शंकर सोनार, पंकज नारायण विसपुते, राजेश लक्ष्मण बिरारी, रत्नाकर देविदास दुसाने, जगदीश सुकदेव देवरे, अनिल बबन सोनार, लतिका अनिल सोनार, रंजना शिरीष भामरे, इच्छाराम गोविंद दाभाडे, प्रकाश बाविस्कर, शरद मधुकर सोनार, उमेश रामदास विसपुते, शरद रमेश रणधीर, सुरेश रघुनाथ सोनार, संदीप ज्ञानेश्वर सोनार, देविदास गंगाधर सोनार आदी समाज बांधव उपस्थित होते.
निवेदन सादर करण्यासाठी सोनार समाजातील असंख्य कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने निष्णात वकीलाची नेमणूक करावी आणि त्वरित न्याय प्रक्रिया पार पडावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली.