भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जोगलखोरी येथील चक्कीजवळ पोलीस तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केली तर महिलेवर एकाने विळ्याने वार करून दुखापत केल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, अंजनाबाई सुधाकर मोरे ( वय – ३० ) या महिला आपल्या मुलासह भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथे राहायला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करते. दरम्यान महिलेने पोलीसात केलेल्या तक्रारीचा रागातून गावात राहाणारे भाईदास धुलकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे सर्व रा. जोगलखोरी, ता. भुसावळ यांनी महिला अंजनाबाई व त्यांचा मुलाला बेदम मारहाण केली तर सागर धुलकर याने विळा घेवून महिलेवर वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली. जखमी महिलेने पोलीसात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे भाईदास धुललकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे सर्व रा. जोगलखोरी, ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.









