पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शेळावे खुर्द येथील ग्रामसभेत घरकुलाबाबत विचारणा करणाऱ्या महिलेला सरपंच पती आणि एकाने शिवीगाळ करत ग्रामसभेतून हाकलून दिल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला दोन जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान शेळावे खुर्द गातातील ग्रामपंचायत कार्यालय आवारात घरकुलासंदर्भात ग्रामसभा चालू होती. एका महिलेने ग्रामसभेत घरकूल मंजूर झाले नाही, याबाबत विचारणा केली असता, सरपंच पती अमोल राजेंद्र पाटील, आसिफ आयुब खाटीक (दोन्ही शेळावे खुर्द, ता. पारोळा) यांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी महिलेला बोलण्यास मज्जाव केला. तरीही बोलले असता, त्यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.