अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी घडली आहे. मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील अंतुर्ली येथील संजय आसाराम पाटील व त्यांच्या पत्नी वंदना संजय पाटील हे खापरखेडा-अंतुर्ली रस्त्याने शेतात जात असताना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच ५४ ए ०१८८) वरील चालक भरत निंबा पाटील (रा. अंतुर्ली) याने भरधाव वेगाने वंदना पाटील यांना धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भरत पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.