चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : – सर्पदंश झाल्यानंतर उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या खडकी बुद्रुक येथील ५४ वर्षीय महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिरकनबाई सुपडू बेलेकर (वय ५४, रा. खडकी बु.) असे मयत महिलेचे नाव आहे. हिरकनबाई बेलेकर यांच्या पश्चात पती, २ मुले, मुलगी, नातवंड असा परिवार आहे. त्या तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील या शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतात काम करीत होत्या. काम करत असताना हिरकनबाई बेलेकर यांना ५ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांना सायंकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हि घटना २३ जुलैला घडली. घटनेमुळे खडकी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.